मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची दै. सामनासाठी कार्यकारी संपादक विशेष मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीला देवेंद्र फडणवीस यांनी फिक्स मॅच म्हणत मुलाखतीवर टीका केली आहे.
“WWF ची आपण पाहिलीये का… तशी पूर्वी नूरा कुस्ती देखील व्हाचची… त्याला मॅच फिक्सिंग असं म्हणतात. असंच मॅच फिक्सिंग म्हणतात… आणखी एक दिवस ही फिक्स मॅच चालणार आहे. मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या मग मी यावर योग्य वेळी उत्तर देतो”, असा देवेंद्र फडणवीस यांनी मम्हणत असं सूचक केलं आहे.
त्याचबरोबर फडवणीसांनी आदित्य ठाकरे यांनाही निशाण्यावर धरलं .मुख्यमंत्री ज्यांना वाटेल त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनल्याने शहाणपणा येतच अस नाही… जाऊ द्या…नया है वह असं म्हणत आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली.
त्याचबरोबर फडणवीस म्हणाले स्वतः स्वतःला मारून घ्यायचा आणि मग रडायचं असं सध्या संजय राऊत यांचे वर्तन चालू असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच राज्य सरकार कोरोणा चे आकडे लपवत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा सरकारवर फडणीसांनी केला.
इथे ही वाचा
अभिताभ आणि अभिषेक यांच्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या ला सुद्धा कोरोणाची लागण…
कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पाच तासात निगेटीव्ह, धारावी पॅटर्न राबवा – राजेंद्र पातोडे.
‘राजगृह’ तोडफोडी विरुद्ध रिपाई कार्यकर्त्यांची निदर्शने; गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी