काय आहे या वायरल फोटो मागचे सत्य?

7
856

दिल्ली | कोरोनाने सामान्य माणसाची काय हालत करून ठेवलीये याची कल्पना देखील करत नाही. अनेक मजूर शेकडो किलोमिटर अंतर पायी प्रवास करून निघाले आहेत. त्यांना घराची ओढ लागली आहे. मजुरांचे जथ्येच्या जथ्ये मूळ गावी परतत आहेत. एकूणच काळीज पिळवटून टाकणारे चित्र आहे. असाच हृदयाला पाझर फोडणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. आणि तो फोटो आहे दिल्लीत काम करणाऱ्या राम पुकार याचा….!

राम पुकार हा दिल्लीत मोलमजुरी करतो. त्याचं मूळ गावं बिहार. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे . त्याचं कुटुंब सगळं मूळ गावी होतं. पण अचानक लॉकडाऊन झालं आणि त्याला त्याच्या मूळगावी जाता आलं नाही. काल-परवा त्याच्या बायकोचा त्याला फोन आला की आपला एक वर्षाचा मुलगा गेला… तो जागेवर कोसळला…. धायमोकलून रडायला लागला… आणि कुणीतरी तो फोटो आपल्या कॅमेरात कैद केला…!

एका वर्षाच्या मुलाचं तोंड देखील त्याला पाहता आलं नाही. वडिलांविना मुलावर अंत्यसंस्कार पार पाडले. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो आतून पार कोसळला आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला…!

दिल्लीतून निघाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी युपी गेटजवळच त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे पुढचे 3 दिवस गाझीपूरच्या उड्डानपुलाखालीच राम पुकारला रहावं लागलं. 3 दिवस तिथं काढल्यानंतर, काही अधिकाऱ्यांनी राम पुकारला दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर नेऊन सोडलं. तिथून रामपुकार श्रमिक ट्रेनमधून बिहारमधल्या बेगुसरायला पोहचला. मात्र, अद्यापही आपल्या कुटुंबाला भेटण्याचा योग राम पुकारला आलेला नाही. ते एका शाळेत क्वारंटाईन झाले आहेत.

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here