मुंबई | महाराष्ट्रात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर भर दिलेली आहे
राज्यात आतापर्यंत साडेबारा लाख को रोणाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळालेली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
प्रकरणाचा प्रसार रोखण्यासाठी संशोधन चाचण्या होणे अत्यंत आवश्यक आहे या दृष्टीने शासन अधिक प्रयत्नशील असणार आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना चाचण्यांसाठी याची लॅब ची संख्या कशी वाढवता येईल. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग देखील महत्त्वाचे आहेत .याकडेही लक्ष देण्यात येईल. यासंबंधीच्या सूचना देखील महानगरपालिका महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिली गेली आहे .अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
इथे ही वाचा
विकास दुबेचा एवढा होता दरारा, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची हत्या करुनही…
अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!