उदयनराजे- संजय राऊत भिडले… तो प्रश्न विचारल्यावर राऊत झाले आक्रमक!

मुंबई |  उदयनराजेंनी शपथविधीनंतर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा केल्यानंतर त्यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिल्यानंतर यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे .संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्धाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवाजी महाराजांच्या वर का, असा सवाल भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देत राऊत यांनी उदयनराजेंना प्रतिप्रश्न केला. विषय जय भवानी जय शिवाजी चा आहे. बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महारा,ज संभाजी महाराज हा विषय नाही त्यामुळे आपण जय शिवाजी जय भवानी या विषयावरच बोलू.अस संजय राऊत म्हणाले.

उदयनराजेंचं लॉजिक त्यांच्याजवळ राहू द्या, त्यांना वाटतंय की तिथे शरद पवार होते किंवा अन्य लोक होते तर आक्षेप घेतला नाही, तर ती उदयनराजेंची भावना, पण आता समाज माध्यमावरुन ते लोकांपर्यंत पोहोचलंय, असं सांगत जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम इतकीच महत्त्वाची असं माझं मत आहे, असं ते म्हणाले.

महाराजांच्या नावाने कोणीही राजकारण करू नका. उदय राजे भोसले सुद्धा हेच बोलले आहेत. त्यांनी काही चुकीचं म्हटलेलं नाही. जय शिवाजी जय भवानी हे घटनाबाह्य नाही. जय शिवाजी हा आमचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला धरून घोषणा दिल्या त्याचबरोबर त राऊत म्हणाले, की व्यंकय्या नायडू काटेकोरपणे त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत.

इथे ही वाचा

धक्कादायक! पुण्यात लॉकडाऊनच्या काळातच वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

आगमन-विसर्जन मिरवणूक नाही तसंच……, कोरोना काळातला पुण्याचा गणेशोत्सव असा असू शकतो!

राष्ट्रवादी युवक व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं पाठवणार!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: