महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतलीये. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
ईडीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरलंय. मुख्यमंत्री म्हणाले, “ईडी वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब तसंच मुलंबाळं आहेत हे विसरू नका.”
“मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. हिंदुत्ववादी म्हणजे एक संस्कृती आहे. आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवलाय,” असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही विरोधकांना दिला आहे.