मुंबई | लॉक डाऊन 30 जून नंतर उठणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.त्याच बरोबर डाऊन हे आहेत असा न राहता टप्प्याटप्प्याने सवलती देऊन अनलॉक करण्यात येईल .असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जेव्हा संवाद साधला तेव्हा सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन 30 जूनला संपत आहे. त्यापुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरू केल्या जात आहे.अजूनही संकट टळलेले नाही तरीही राज्यभरातील सलून दुकान आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आषाढी एकादशी सुद्धा संकटात आली मात्र वारकऱ्यांनी संयम दाखवला .तसेच सर्वांनी आपले सण आपल्या घरातच साजरे केले यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.मी विठुरायाला कोरोणाचे संकट टाळण्यासाठी साकडे घालणार आहे असं सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.