मुंबई | दोन अज्ञात व्यक्तींकडून मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृहावर तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलिस या प्रकरणी संपूर्ण तपास करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
धक्कादायक म्हणजे ,राजगृहाच्या आवारात प्रवेश करून काही गुंडांनी धुडगूस केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. या प्रकरणावर कारवाई करण्याचे कठोर आदेश मी पोलिसांना दिले आहेत.
आपला ग्रंथ खजिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूमध्ये जपून ठेवला.त्याचबरोबर ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नसून तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी ते तीर्थक्षेत्रच आहे , असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय.
इथे ही वाचा
देवेंद्र फडणवीस -‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या
राजगृह तोडफोड प्रकरणावर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
…म्हणून भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली- राहुल गांधी