कोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव

0
14

*

कोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव

मुंबई ता 25/04/2020 -दि. २३/०४/२०२० रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी सेमिस्टर/ शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे निराकरण करण्याबाबत केंद्रीय अनुदान आयोगाकडे (यूजीसी) ई-मेलद्वारे प्रस्ताव सादर केला आहे.

ही विलक्षण परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परीक्षा आयोजित करण्यासाठी गुणांची शिफारस, गुणपत्रिका आणि उत्तीर्ण निकषांची शिफारस करण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे.

आमच्या प्रस्तावाद्वारे आम्ही यूजीसीला विनंती केली की त्यांनी महाराष्ट्र राज्यातील परीक्षे संदर्भात विचार करताना विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण केलेल्या सर्व सेमेस्टरच्या गुणांची सरासरी विचारात घ्यावी आणि जेथे सरासरी गुण/ क्रेडिट गुण / ग्रेडच्या आधारे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याऐवजी त्यांच्या अगोदरच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करून त्यांची सरासरी करून वार्षिक परीक्षा किंवा पुढच्या सेमिस्टरसाठी गुण प्रदान करण्यात यावेत. जर परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली तर शैक्षणिक वर्ष जुलै/ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये अधिक सहजतेने सुरू करण्यास विद्यापीठ आणि महाविद्यालये सक्षम होतील त्यामुळे आम्ही खाली नमूद केल्याप्रमाणे आमचा प्रस्ताव ई-मेल द्वारे यूजीसीला सादर केलेला आहे.

प्रस्ताव

१.मागील सर्व वर्षांची / सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून पुढील प्रलंबित परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करणे.

स्पष्टीकरणः

अ.पदवीधर अभ्यासक्रम (एटीकेटी विद्यार्थ्यांचा समावेश)

i. वार्षिक परीक्षा पॅटर्न – पदवीधर अभ्यासक्रमाच्या १ आणि २ वर्षाच्या गुणांची सरासरीची काढून तृतीय(अंतिम) वर्षाच्या प्रलंबित परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करणे.

ii. सेमिस्टर एंड परीक्षा – पदवीधर अभ्यासक्रमाच्या १, ३ आणि ५ सेमिस्टरच्या गुणांची सरासरीची काढून आणि २,४ व ६ प्रलंबित सेमिस्टरसाठी सरासरी गुण प्रदान करणे.

ब. पदव्युत्तर अभ्यासक्रम (एटीकेटी विद्यार्थ्यांचा समावेश)

i. सेमिस्टर एंड परीक्षा – आधीच्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून प्रलंबित सेमेस्टरसाठी सरासरी गुण प्रदान करणे.

२. शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांकरिता युजीसीच्या कृती योजना २००९ नुसार विविध राज्ये विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि ग्रेडिंग सिस्टम, ९ पॉईंट पॉईंट स्केल आणि संचयीत ग्रेड पॉइंट स्कोअर लागू केलेल्या आहेत.

स्पष्टीकरण-
अ.विद्यार्थ्याने मिळविलेले सरासरी क्रेडिट पॉईंट आणि संचयित ग्रेड पॉईंट स्कोअर एकत्रित करून त्याची सरासरी काढून याआधारावर प्रलंबित परीक्षेसाठी गुण प्रदान करता येऊ शकतात.

३. योग्य वेळी सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस (CAP) आयोजित करणे जेणेकरुन विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येऊ नये.

स्पष्टीकरण-

अ. अंतिम वर्षाच्या गुणांवर गुणवत्ता यादी तयार केली जावी

ब. सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस (CAP) नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासु) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे म्हणाले की बर्‍याच विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षा आयोजित करण्याबाबत कोणताही घाईचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. केवळ परीक्षा महत्त्वाच्या नसून प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन, निकालाची घोषणा व पुढील वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही महत्त्वाची आहे.

आम्ही महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि राज्याने नियुक्त केलेल्या कुलगुरू समितीशी बोलणे झाले आहे , मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंचा समावेश या समितीमध्ये असून आम्ही राज्यातील विविध विद्यापीठांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत परंतु आम्हाला कोणताही अर्थपूर्ण अभिप्राय अजूनही मिळालेला नाही किंवा योग्य चर्चा होण्याची संधी मिळाली नाही असे मासुच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.दीपा पुंजानी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या काही महिन्यांत परिस्थिती कशी नियंत्रणात येईल हे आताच सांगणे अद्याप अवघड आहे कारण या प्राणघातक विषाणूंचा महाराष्ट्रावर जास्त वाईट परिणाम दिसून येत आहे, असे मासुचे सरचिटणीस श्री सुनील शिरीषकर यांनी सांगितले.

आमची संघटना ही विद्यार्थी न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी कार्यरत आहे आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल तसेच त्यांच्या भविष्याबद्दल खूप काळजी आहे. माझ्या मते, मे महिन्यात महाराष्ट्रातील कुलूपबंद जरी उठविला गेला तरी परिस्थिती सामान्य होण्यास अजून काही महिने तरी लागतील, असे मासुचे उपाध्यक्ष श्री सुनील देवरे यांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here