मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.
या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली.
या ठिकाणी फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि ठिकठिकाणी भगवे झेंडेही बसवण्यात आले होते.