यूपी, बिहार सरकारी डॉ.पेक्षा महाराष्ट्रात सरकारी डॉक्टरांना वेतन कमी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेवण्याऱ्या डॉक्टरांचा विचार कराच :- अतुल भातखळकर

1
8

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच डॉक्टर आपले जीवन धोक्यात घेऊन सेवा देत आहेत. तर मागील पंधरा दिवसांपूर्वी एका वरिष्ठ डॉक्टर यांची कोरोना कोविड 19 ने निधन झाले होते. डॉक्टर आपल्या प्राण लावून काम करत आहेत तसेच काही डॉक्टर प्राण गमावत आहेत. कांदिवली पूर्व मतदार संघातील आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धार ठाकरे यांना थेट आपल्या ट्विटर च्या माध्यमातून प्रश्न केला आहे..? जर यूपी बिहार मधील डॉक्टर यांना महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या वेतनापेक्षा जास्त प्रमाणत वेतन आहे. तर महाराष्ट्र राज्यतील डॉक्टर यांना वेतन कमी का आहे. अशी टीकाही त्यांनी केली. त्याच सोबत त्यांनी एक वृत्त प्रत्राची प्रत जोडली होती.

“काय म्हणाले अतुल भातखळकर .?”

यूपी आणि बिहारमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना जास्त वेतन मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी काय घोडं मारलय?
उद्धवजी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेवणाऱ्या डॉक्टरांचा जरा विचार कराच!
इथे हि वाचा
इंदूमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या घेणार व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे आढावा
निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
अमेरिका म्हणते २० लाख डोस तयार, ब्रिटनमध्ये २ अब्ज लसीचेही उत्पादन सुरू

1 COMMENT

  1. महाराष्ट्रातील डॉक्टरांचा पगार काही आज ठरवलेला नाही भातखळकर साहेब आपल्या कर्तबगार, पारदर्शी, आभ्यासु मुख्यमंत्र्याच्या काळात पण हाच पगार डॉक्टरांना मिळत होता तेव्हा युपी,बिहारच्या डॉक्टरांचा पगार तुम्हाला बरा आठवला नाही.
    मला वाटते आपण सर्वांनी महाआघाडीच्या नावाने थोडी जास्तच हळद पिऊन इम्युनीटी वाढवायचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here