शिवाचार्यांच्या मारेक-यांना ताबडतोब अटक न झाल्यास वंचितच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडणार – राजेंद्र पातोडे

0
3

मुंबई, दि २४- शिवसंस्कृतीचे प्रचारक पुज्य श्री गुरु रुद्रपशुपती शिवाचार्य महाराज नागठाणकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.शिवाचार्यांचे मारेकरी ताबडतोब अटक न झाल्यास वंचित बहूजन आघाडीच्या वतीने लिंगायत आंदोलनाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शिवानंद हैबतपूरे महाराज यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात संचार बंदीच्या काळात मारेकरी मठात घुसून मठाधिपतींची हत्या करतात, ही बाब संतापजनक आहे. ह्या हत्येचा वंचित बहूजन आघाडी तीव्र निषेध व्यक्त करते.ही बाब अतिशय गंभीर आहे.ह्या प्रकरणात सरकारने विशेष लक्ष घालून पोलीस प्रशासनास ताबडतोब मारेक-यांना बेड्या ठोकून जेरबंद करण्यासाठी कामाला लावावे.आरोपींना अटक करुन त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला चालवून तातडीने फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजनआघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.श्री गुरु रुद्रपशुपती शिवाचार्यांची हत्या व मठावर झालेला हल्ला हा शिवसंस्कृतीचा मोठा अवमान असून याविषयी वंचित बहुजन आघाडी गंभीर आहे. लिंगायत धर्माच्या आस्थेचे प्रतीक असणार्या मठावर आणि मठाधिपती वर राजरोसपणे हल्ले होत असताना हे सहन केले जाणार नाही.मॉब लिंचींग करून रस्त्यावर साधूंची हत्या केल्याची शाई वाळत नाही तोच मठात घुसून मठाधिपतींची हत्या केली जात आहे. ह्या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास लिंगायत आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन ऊभे करण्यात येईल.आंदोलना बाबत सरकारला असा इशारा लिंगायत आंदोलनाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शिवानंद हैबतपूरे महाराज यांनी आधीच दिला आहे.

ह्या प्रकरणात तात्काळ अटक न झाल्यास संचार बंदीच्या व लाॅकडाऊनचे सर्व नियम तोडून वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन ऊभे करेल त्याची सर्व जबाबदारी ही गृह विभाग व महाराष्ट्र सरकारची राहील.अशी तंबी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.असे राज्य प्रसिध्दी प्रमुख सुरेश नंदिरे ह्यांनी कळविले आहे.

इथे हि वाचा 

#महाराष्ट्रानेआणखीनएकहिरागमावला 😥😢 वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांचे थोड्यावेळापूर्वी कोरोना आजाराने निधन झाले.

मानवामधील वाईट वृत्तीचा घातक विषाणू हा कधी संपेल काय माहित?

आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here