वंचित बहुजन आघाडीच्या २ आमदारांनी केला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

1
3

अकोला वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.

बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता वंचितचे आणखी दोन आमदार सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत.

आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार श्री. बळीराम शिरस्कर आणि श्री. हरिदास भदे यांनी श्री. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला

इथे हि वाचा
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत
पश्चिम बंगालमध्ये अंफाण वादळात उध्वस्त झालेल्या दलितवस्त्यांचे पुनर्वसन करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आवाहन
ATKT बदल काय म्हणाले उदय सामंत

1 COMMENT

  1. टाइम्स ऑफ मराठी चे डोके ठिकाणावर आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here