लिंगदरीत वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचे उदघाटन

हिंगोली-सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचे उदघाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. या गावाला धम्मचक्र प्रवर्तन दिनाची 50 वर्षाची परंपरा असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन आज वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा महासचिव मा.रविंद्रभाऊ वाढे, प्रमुख मार्गदर्शक मा.श्रीरंग मामा शिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा सचिव मा.ज्योतीपाल रणवीर,युवा नेते योगेश नरवाडे,राज अटकोरे,बबन भूक्तर,शंकर पौघे, सुनील बनसोडे,धम्मकिरण उबाळे,युवराज उबाळे,समाधान कांबळे,संजय वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीची येत्या काळात असणारी भूमिका मांडली..आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा.श्रीरंग मामा शिरसाठ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले..आंबेडकरी चळवळीतील विविध अनुभव त्यांनी यावेळी मांडले.

समाधान खन्दारे यांनी सूत्रसंचालन केले तर शाखा अध्यक्ष भारत कांबळे यांनी आभार मानले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Posts

%d bloggers like this: