‘वंचित’च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात!
सोलापूर – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून सोलापुरात ओपीडी बेसवर कम्युनिटी हॉस्पिटलची सोय करण्यात आलेली आहे.
गेल्या 27 मे रोजी माता रमाई यांच्या स्मृतिदिना निमित्त जोपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत शहरातील लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी सदरची ओपीडी प्रत्येक ठिकाणी दररोज सकाळी दोन तास ते संध्याकाळी दोन तास अशा पद्धतीने सुरू ठेवण्यात आलेली आहे. आतापर्यंत सात हजाराच्या लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
या ओपिडीमध्ये डॉ चिडगुपकर हॉस्पिटलचे डॉ शेखर चिडगुपकर, डॉ निशिकांत मस्के, डॉ सचिन पुराणिक दवाखाना, डॉ अमोल सोनवणे, डॉ अशोक जोशी, डॉ राम गायकवाड, डॉ मयुरी वाघमारे, डॉ शितल चिलंगुडे, डॉ श्रीनिवास बंदगी यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली.
यासाठी नगरसेवक गणेश पुजारी, वंचित बहुजन आघाडीचे बबन शिंदे, तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अमित माने , संजय इंगळे, विकी माळाळे,शैल गायकवाड, विजू जाधव ,सागर शिंदे, भालचंद्र कांबळे, राजू दुपारगुडे, श्रीकांत पवार, पांडुरंग सोनवणे,सिकंदर शेख सुरज कांबळे, देवीदास मुनगल यांनी व्यवस्थेचे काम पाहिले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून हे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
इथे हि वाचा
पिंपळाच्या झाडाला जीवदान
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण झाले
अकोल्यातील हे चार हवालदार बनवले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक.
One thought on “‘वंचित’च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात!”