..व्रतस्थाची सावली हरपली

0
43

सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १६ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

सविताताई ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पाठिशी सावलीसारख्या उभ्या होत्या. एका व्रतस्थाची ही सावली हरपली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

निखळ पत्रकारितेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्या मागे सविताताई तितक्याच खंबीरपणे उभ्या होत्या. शिक्षिका म्हणून अनेकांना घडविणाऱ्या सविताताईंनी पतीच्या ध्येयवादी पत्रकारीतेसाठी तितक्याच समर्थपणे साथ दिल्याचे शोक संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here