कोल्हापुर | मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे कोल्हापूर येथे बोलत असताना फडवणीस सरकार सत्तेवर असताना काय दिवे लावले माहित आहे, असा टोला विरोधी पक्षनेते फडवणीस यांना दिला आहे .
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, फडवणीस सरकार जर आता या काळात सत्तेवर असते तर कोरोणाचा प्रश्न दोन दिवसात सुटला असता. यावर वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
तसे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, दोन दिवसांचा कालावधी त्यांना जास्त झाला असता त्यांनी दोन मिनिटातच प्रश्न सोडवला असता असा जोरदार टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
दरम्यान, विरोधकांच्या टीकांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. सारथीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला असताना 500 कोटी दिल्यासारखे सत्ताधारी वागत आहेत. कोकणातील चक्रीवादळाचा पंचनामा झालेला नाही, मदतही नाही.असे बोलत विरोधकांच्या चांगलाच समाचार घेतला.विरोधकांच्या या आरोपानंतर पत्रकार परिषदेमध्ये वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले.