“जेल मध्ये जेव्हा माझे स्तन कापण्यासाठी आले होते….” नीरा आर्य, गुप्तहेर, आजाद हिंद फौज

नीरा आर्य (१९०२ – १९९८) ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद फौज मधील एक सेनानी होती. ती गुप्तहेर असल्याचा आरोप देखील केला जातो. नेताजींच्या आवाहनाला दाद देत ती राणी झांसी रेजिमेंट मध्ये रुजू झाली. नेताजींना तिला आपली मुलगी मानले होते. फौज मध्ये ‘नीरा नागिणी” म्हणून देखील ती ओळखली जायची. नीराने कलकत्ता येथे स्थित ब्रिटिश सरकार मध्ये CID असलेल्या श्रीकांत जयरंजन दास याच्याशी लग्न केले होते. नेताजींचा जीव वाचवण्यासाठी नीराने आपल्या पतीची हत्या केली होती. पुढे जेव्हा आजाद हिंद सेनेने समर्पण केले होते, त्यावेळेस आजाद हिंद फौजच्या सर्व सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्यांना सोडून देण्यात आले, मात्र नीराला पतीच्या हत्येसाठी आणि ती गुप्तहेर असल्याच्या संशयाने तिला अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. नीराने आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातील एक अंश. ती लिहिते –


कलकत्त्यावरून मला अंदमानला आणण्यात आले व एका कोठरीत डांबण्यात आले. माझ्या हातापायाला लोखंडी साखळदंड बांधण्यात आले होते. या कोठरीत पूर्वी महिला राजकैदी ठेवण्यात आले होते. अंथरायला व पांघरायला काहीच नव्हते आणि मी तशीच झोपी गेले. मध्यरात्री माझ्या अंगावर दोन कांबळी फेकण्यात आल्या. सकाळी उठल्यावर मला खिचडी देण्यात आली. त्यानंतर जेलर आणि एक लोहार माझ्या कोठडीत आले. लोहार ने माझ्या हातातील साखळदंड कापताना माझ्या हाताला देखील जखम केली. मी तो त्रास सहन करीत होते मात्र तो अतिशय निर्दयपणे काम करत होता. पायातील लोखंडाचे साखळदंड कापताना त्याने माझ्या घोट्यावर अनेकवेळा हाथोडीचे वार केले. त्यावेळेस कळवळून मी त्याला म्हटले, ” आंधळा आहेस का? नीट बघून काप” त्यावेळेस तो लोहार उद्धटपणे हसत म्हणाला, ” पायावरच काय, मी तर तुझ्या हृदयावर देखील वार करिन. काय करणार आहेस तू?
“हो, मी तर तुमच्या बंधनात आहे. काय करू शकते मी?” असे म्हणत मी त्याच्या तोंडावर थुंकले आणि म्हणाले, ” महिलांचा आदर करायला शिक”
हे पाहून जेलर ओरडला, “तुला आम्ही सोडून देऊ जर तू आम्हांला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ठावठिकाणा कळवलास तर”
“ते तर विमान दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत. साऱ्या जगाला हे माहित आहे” मी उत्तरले.
“नेताजी जिवंत आहे. तू खोटं बोलत आहेस” जेलर पुन्हा कडाडला.
“हो, नेताजी जिवंत आहेत. ते आमच्या हृदयात जिवंत आहेत” मीही रागाने म्हटले.
“तर मग आम्ही तुझ्या नेताजीला तुझ्या हृदयातून देखील काढून टाकू” असे म्हणत जेलरने माझ्या ब्लाऊजला हात घातला आणि तो फाडून टाकला. लोहाराकडे कटाक्ष टाकत जेलरने त्याला खुणावले. लगेच लोहाराने बागेतील झाडांच्या फांद्या कापायची सदृश कैची सारखे हत्यार आणले आणि माझ्या उजव्या स्तनाला त्यात पकडत कापायला सुरुवात केली. मला प्रचंड वेदना होत होत्या. माझे हात धरून ठेवण्यात आले होते. मात्र सुदैव कि कैचीला धार नव्हती. ती बोथट होती मात्र माझा स्तन त्यात पूर्णपणे दाबला गेला होता. जेलरने माझी मान मागे ओढत म्हणाला, “जर पुन्हा तोंड वर करून बोललीस तर तुझ्या छातीवरचे हे दोन्ही फुगे उखडून टाकीन”
नंतर एका चिमट्यासारख्या अवजाराने माझ्या नाकावर मारीत म्हणाला, ” राणी व्हिटोरीयाचे आभार मान…जर या कैचीला गरम करून आणले असते तर तुझे दोन्ही स्तन उखडून काढले असते” अशा अनेक यातनांतून नीराला जावे लागले.

स्वतंत्र्ययोत्तर नीराला सोडण्यात आले आणि तिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून सरकारी मदत किंवा पेन्शन देऊ करण्यात आली होती, मात्र स्वाभिमानी नीराने हे नाकारले आणि उर्वरित आयुष्य रस्त्यावर फुले विकून व्यतीत केले. १९९८ साली नीराचे हेंद्राबाद येथे निधन झाले.

देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या अशा अगणित खऱ्या “स्वातंत्र्यवीरांना” सलाम…
साभार: सागर प्रकाशन, सोशल मीडिया
इथे हि वाचा
शिवराज्याभिषेक दिनासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप; पुण्यात भाजप नेत्याविरोधात तक्रार
विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू
स्टर्लिंग इंजिनचे आविष्कारकर्ते -डॉ.रॉबर्ट स्टर्लिंग

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: