पुणे | कोरोणाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा अनेक नागरिक मास्क न लावताच रस्त्यावर फिरत असताना दिसत आहेत.नागरिकांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध नागरिक पाळत नाहीत म्हणून पुन्हा लॉक डाऊन घोषित करावा असा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी दिलेला आहे.
पुणे शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.शहरातील लोक नियमांचे उल्लंघन करत कारण शिवाय मास्क न लावता बाहेर फिरतांना दिसत आहेत . त्यामुळे नवल किशोर राम यांनी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा इशारा दिलाय.
ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरी भागातसुद्धा नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे
मास्क वापरला जात नाही तसेच लग्नसमारंभात सुद्धा गर्दी होताना दिसत आहे. या दृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आलेली आहे , असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांन सांगितलं आहे.
कोरोना बाधितांचे आकडा हा 28 हजार 996 एवढा पुणे जिल्ह्यात झालेल्या आहे .त्याचबरोबर त13 हजार 971 रुग्ण बरे झालेले आहेत तसेच विचार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इथे ही वाचा
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र मराठा आरक्षणाबाबत सुनावणी…
कोरोनावर मात करण्यासाठी अजित पवारांनी उचललं धाडसी पाऊल…
जयंत पाटील- माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान…