पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचं नाही त्यामुळे नियम पाळा-यशोमती ठाकूर

Spread the love

अँकर:-अमरावती जिल्हात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे, त्यामुळे आज अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक घेतली,यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त करत कोरोना नियम आता यापुढे सक्तीने पाळावे लागतील अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागतील असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला,तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नाही त्यामुळे नियम पाळा असेही त्यांनी सांगितले,तर त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या तर कोरोनाची लाट पुढे येऊ नये यासाठी कोरोना नियम पाला असे आवाहन त्यांनी यावेळी केले,अमरावती जिल्हात दररोज १००च्यावर रुग्ण वाढत आहे,तर काल तब्बल२३५रुग्ण वाढले होते,जिल्हात आतापर्यंत२३२९३कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून आतापर्यंत२२२६१रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर४२३रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

बाईट:-यशोमती ठाकूर, पालकमंत्री अमरावती


Spread the love